वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 3.36 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. भूकंपाचे धक्के सौम्य होते पण तरीही लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर दिल्ली होता. सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. साधारणत: लोक आपापल्या घरात दिवाळीच्या तयारीत व्यस्त असताना भूकंपामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.