वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कौशल्य विकास घोटाळाप्रकरणी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नियमित जामीन याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 15 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली. नायडू 28 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्याविऊद्ध गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पाच प्रकरणांचा तपास करत आहे. यामध्ये अवैध दारू दुकानांना परवाना देणाऱ्या दारू घोटाळ्याचा समावेश आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने 31 ऑक्टोबर रोजी नायडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. याशिवाय कौशल्य विकास घोटाळा, अंगलु प्रकरण, फायबर नेट योजना प्रकरण आणि अमरावती रिंगरोड प्रकरणात नायडूंविरोधात चौकशी सुरू आहे.









