मुंबई
आयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संस्थापक आणि संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सी. पी. गुरनानी हे येत्या डिसेंबरमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 डिसेंबरपर्यंत ते कंपनीत आपले काम करणार आहेत. यांच्यासोबत विजयकुमार हे बिगर कार्यकारी, बिगर स्वतंत्र संचालक हेही पायउतार होणार आहेत. गुरनानी हे महिंद्रा समूहामध्ये 2004 पासून कार्यरत आहेत.









