सावंतवाडी : प्रतिनिधी
डेगवे माऊली मंदिरापासून काही अंतरावर गुरुवारी सायंकाळी सुभाष नारायण देसाई व ऋषी रामचंद्र देसाई याना नारोगुनो येथे
कटरने साफसफाईचे काम करत असताना दोन बिबट्या दिसले. उंच दगडावर ते शिकार करण्याच्या पवित्र्यात असताना त्यांचे दर्शन झाले. त्यामुळे या दोघाही ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली . अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून बिबट्याचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला .
परंतु, लांब अंतर असल्यामुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी गावातील कॅमेरामन सिद्धेश देसाईंना बोलावून घेतले .त्यांनी आपल्या कॅमेरात फोटो टिपले आहेत. दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ग्रामस्थांना डेगवेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे.