दिवाळीनिमित्त कोणत्याही खरेदीवर भेट म्हणून 1 पंचमुखी रुद्राक्ष
बेळगाव : मूळच्या हैदराबाद येथील इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेच्यावतीने येथील बी.एस.सी. मॉल रोड, जुन्या कॉर्पोरेशन बिल्डींगसमोर, पहिल्या गेटजवळ, साई पदम् बिल्डींग, टिळकवाडी, बेळगाव येथे रुद्राक्षांचे प्रदर्शन 2 ते 12 नोव्हेंबरपर्यंत भरविण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात विविध प्रकारच्या रुद्राक्षांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केल्याची माहिती इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे संचालक नरेंद्र काशीरे•ाr यांनी दिली. रुद्राक्षासंबंधी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, एकमुखी रुद्राक्षपासून 21 मुखी रुद्राक्ष प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एखाद्याच्या जन्मदिनांकावर आधारित रुद्राक्ष हवे असेल तर त्यासाठी वेदगणित शास्त्रानुसार रुद्राक्ष देण्यात येईल. त्यासाठी पंचांग अथवा कॉम्प्युटरची जरुरी नाही. खास म्हणजे दिवाळीनिमित्त कोणत्याही खरेदीवर भेट म्हणून 1 पंचमुखी रुद्राक्ष देण्यात येईल. ते म्हणाले, गौरीशंकर रुद्राक्ष आणि निसर्गदत्त रुद्राक्ष दोन्ही एकच असतात. प्रदर्शनामध्ये विक्री झालेला रुद्राक्ष नकली असल्याचे सिद्ध झाल्यास रुद्राक्ष विकत घेतलेल्या रकमेच्या दोनपट रक्कम आम्ही देतो. सिद्धमाळा, जपमाळा, स्पटीकमाळा, तुळशीमाळा, शाळीग्राम, शिवमाळा, ज्ञानमाळा अशा विविध प्रकारच्या रुद्राक्ष माळा प्रदर्शनात ग्राहकांना पाहायला मिळतील. शिवपुराणानुसार रुद्राक्ष माळा घातल्याने जीवनात सुख-समृद्धी, भरभराट होते. त्या अनुषंगाने ग्राहकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे संचालक नरेंद्र काशीरे•ाr मो. 9885211449, 7799211449 यांच्याशी संपर्क साधावा.









