जिल्ह्यातील 14 संघांचा समावेश
बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक निमंत्रितांची साखळी फुटबॉल स्पर्धा गुरुवार दि. 9 पासून लव्ह डेल स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारपासून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा 9 ते 18 नोव्हेंबर दरम्यान प्रकाशझोतात खेळविली जाणार आहे. सदर स्पर्धेत 14 संघांनी भाग घेतला असून चार गटात हे संघ विभागले गेले आहेत. अ गटात ब्रदर्स, बुफा, फॅन्को, ब गटात आयबी सीटी, कॉसमॅक्स, उग्रा, सी गटात साईराज, निपाणी, स्वस्तिक, सीटी स्पोर्ट्स तर ड गटात फास्ट फॉरवर्ड, मजर युनायटेड, खानापूर व शिवाजी कॉलनी या संघांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरचे आमदार राजू सेठ, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, पॅट्रॉन राम हदगल, साईराज स्पोर्ट्सचे अध्यक्ष महेश फगरे, सचिव आनंद चव्हाण, इम्रान फतेखान, अमजत खान, राहुल मगदूम, अश्पाक घोरी, समिउल्ला मुल्ला, आयोजक प्रणय शेट्टी, पुणित शेट्टी, प्रसन्ना शेट्टी आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना ब्रदर्स एफसी विरुद्ध बुफा यांच्यात सायंकाळी 6 वाजता, दुसरा सामना फास्ट फॉरवर्ड विरुद्ध शिवाजी कॉलनी यांच्यात 7.30 वाजता खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवार दि. 9 रोजी पहिला सामना ब्रदर्स वि. बुफा, दुसरा सामना फास्ट फॉरवर्ड वि. शिवाजी कॉलनी, शुक्रवार दि. 10 रोजी आयबीसीटी वि. उग्रा, दुसरा साईराज वि. स्वस्तिक, शनिवार दि. 11 रोजी पहिला ब्रदर्स वि. फॅन्को, दुसरा मजर युनायटेड वि. खानापूर, तिसरा सामना निपाणी वि. सिटी स्पोर्ट्स, चौथा सामना आयबीसीटी वि. कॉसमॅक्स, रविवार दि. 12 रोजी पहिला सामना मजर युनायटेड वि. शिवाजी कॉलनी, दुसरा बुफा वि. फॅन्को, तिसरा सामना साईराज वि. निपाणी एफ. सी., चौथा सामना फास्ट फॉरवर्ड वि. खानापूर, 14 रोजी कॉसमॅक्स वि. उग्रा, दुसरा स्वस्तिक वि. सीटी स्पोर्ट्स, 15 रोजी खानापूर वि. शिवाजी कॉलनी, दुसरा साईराज वि. सीटी स्पोर्ट्स, 16 रोजी फास्ट फॉरवर्ड वि. मजर, दुसरा निपाणी वि. स्वस्तिक सामने खेळविण्यात येणार आहेत. तरी संघानी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









