मुंबई :
प्रिन्स पाईप आणि फिटिंग यांच्या समभागाने बुधवारी शेअरबाजारामध्ये दमदार तेजी दाखवली होती. प्रिन्स पाईपचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 13 टक्के इतका वधारत 705 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीने सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला असून त्याचे परिणाम समभागावर बुधवारी पहायला मिळाले. कंपनीचा समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर या आधी 13सप्टेंबरला पोहोचला होता. त्यावेळी 759 रुपयांवर व्यवहार करत होता. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये 71 कोटी रुपयांचा नफा कंपनीने मिळविला आहे.









