मुंबई :
अॅपलने आपल्या मॅकबुक प्रो आणि 24 इंच आयमॅक एम थ्री सिरीज चिपसह ही दोन्ही उत्पादने भारतामध्ये विक्रीकरता आता उपलब्ध केली आहेत. यासंबंधीची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे. सदरची दोन्ही उत्पादने अॅपल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तसेच मुंबई व दिल्लीतील स्टोअरवर ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत.
मॅकबुक प्रो एम थ्री 14 इंच व 16 इंच डिस्प्लेसह सादर करण्यात आला असून 128 जीबी मेमरीसह याची किंमत 1 लाख 69 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. मॅकबुक काळ्या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. 24 इंच आयमॅक हा सुद्धा एम थ्री चिपसोबत येणार असून त्याची किंमत 1 लाख 34 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. 24 जीबी मेमरीसह हिरवा, पिवळा, नारंगी, गुलाबी, निळा, चंदेरी आणि पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध केला आहे.









