आठवड्यातून दोनवेळा करता येणार प्रवास
बेळगाव : दिवाळी सुट्यांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर ते जोधपूर या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. दि. 11 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर यादरम्यान आठवड्यातून दोनवेळा एक्स्प्रेस धावणार आहे. बेंगळूर येथील एसएमव्हीटी बेंगळूर स्थानकातून सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी निघालेली एक्स्प्रेस पहाटे 4 वाजून 05 मिनिटांनी बेळगावला पोहोचेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी जोधपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी जोधपूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी बेळगावला पोहोचेल. तर रात्री 11.30 वा. बेंगळूरच्या एसएमव्हीटी रेल्वेस्थानकावर पोहोचेल. या रेल्वेला तुमकूर, तिप्तूर, हसिगेरे, बिरुर, दावणगेरे, राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, पाटण, भिलडी, धनेरा, राणीवाला, मरवार, भिनमल, जालोर, समधिरी, लुणी या रेल्वेस्थानकांवर थांबा दिला जाणार आहे. एकूण 20 डब्यांचा समावेश रेल्वेमध्ये असणार आहे.









