सचिन तलवारला सामनावीर, मालिकावीर महंमद अब्बास
बेळगाव : के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट अकादमी आयोजित मदर इंडिया चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्टस क्लबने जिमखानाचा 7 धावांनी पराभव करून मदर इंडिया चषक पटकाविला. सचिन तलवारला सामनावीर तर मालिकावीर महंमद अब्बास यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. जिमखाना मैदानावर अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडीबाद 174 धावा केल्या. त्यात सचिन तलवारने 8 चौकारासह 71, दर्श रेवणकरने 5 चौकारासह 45 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे अब्बासने 3 तर सलमानने 1 गडीबाद केला.
प्रत्युतरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 25 षटकांत 6 गडीबाद 167 धावाच केल्या. त्यात शहारुख डी. ने 5 चौकारासह 53, साईराज पी.ने 5 चौकारासह 44, तर अब्बासने 26 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे आदित्य बी. व अल्तमश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ज्योती पाटील, आरती पोरवाल, विनोद पाटील, चंदन कुंदरनाड, प्रशांत लायंदर, अनिल गवी यांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब व उपविजेत्या युनियन जिमखाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सचिन तलवार, उत्कृष्ट फलंदाज- स्वयम खोत (लायाज), उत्कृष्ट गोलंदाज- कनिष्क वर्णेकर (बीएससी) इम्फॅक्ट खेळाडू- महम्मद हमजा (जिमखाना), मालिकाविर- महम्मद अब्बास याना चषक देऊन गौरविण्यात आले. शाहिद आणि सुजित यांनी पंचांची भूमिका बजावली.









