आठ महाविद्यालयांच्या 500 अधिक खेळाडूंचा समावेश : फार्मसी पथसंचलनात विजयी
बेळगाव : केएलई डीम टू युनिर्व्हसिटी आयोजित केएलई अंतर्गत काहेर क्रीडा स्पर्धांना जिल्हा क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडागंणावर आयोजित या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एमएलआरआयसीचे कंमाडंड विंगचे मेजर शेरॉन, जे. एन. एम. सी. मेडिकल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. एस. महांतशेट्टी, रणजित कांगले, एम. एस. गणाचारी, डॉ. सुनील जलनपुरे, क्रीडा निर्देशक रवींद्र खोत, प्रा. एम. बी. पाटील, किरण गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. पाहुण्यांचे स्वागत डॉ. एन. एस. महांतशेट्टी यांनी केले. केएलई विद्यापीठाच्या नामवंत क्रीडापटूंनी क्रीडाज्योत मैदानाभवती फिरून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. सर्व क्रीडापटूंना क्रीडा निर्देशक रवींद्र खोत यांनी शपथ दिली. उत्कृष्ट पथसंचलनाचे बक्षीस केएलई फार्मसी संघाने पटकाविले. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 100 मी., 200, 400, 800, 1500, 4×100, रिले 4×400 रिले 4×100 मिक्स रिले, थाळी फेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी आदी खेळाचा समावेश आहे. यावेळी जी. एन. पाटील, शांतू पाटील, एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकार, भरत अगशीमनी, सदानंद मालशेट्टी, व्ही. एस. पाटील, संजू नाईक आदी उपस्थित होते.









