वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लखनौमध्ये 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या महिलांच्या आंतरविभागीय टी-20 स्पर्धेसाठी उत्तर विभाग संघाचे नेतृत्व शेफाली वर्माकडे सोपविण्यात आले आहे. अष्टपैलू हर्लिन देओल संघाची उपकर्णधार म्हणून राहील. या स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा उत्तरविभाग संघ जाहीर करण्यात आला.
उत्तर विभाग संघ – शेफाली वर्मा (कर्णधार), हार्लिन देओल (उपकर्णधार), श्वेता शेरावत, पारूशी प्रभाकर, सुषमा वर्मा, तानिया भाटीया, अमनज्योत कौर, के. गौतम, निलम बिस्त, मनत काश्यप, पी. सिसोदीया, अमनदिप कौर, चित्रासिंग जमवाल, सुमन गुलीया आणि मधू धामा.









