वृत्तसंस्था / माले (मालदीव)
एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या ड गटातील सामन्यात ओडिशा एफसी संघाने मालदीवच्या माझिया स्पोर्ट्स क्लबचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
खंडीय क्लबस्तरीय सेकंड टीयर दर्जाच्या या फुटबॉल स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यातील विजयामुळे ओडिशा एफसी संघाने उपांत्यफेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात मध्यंतरावेळी दोन्ही संघ बरोबरीत होते. आता ओडिशा एफसी संघाचा पुढील सामना कोलकाता येथे 27 नोव्हेंबर रोजी मोहन बागान संघाबरोबर होणार आहे.









