प्रतिनिधी/ बेंगळूर
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळून पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मंड्या जिल्ह्यातील बन्नघट्ट (ता. पांडवपूर) येथे घडली आहे. स्वीफ्ट कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार बन्नघट्टनजीकच्या पुलावरून व्हीसी कालव्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच तेथे दाखल झालेल्या अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कालव्यात पाणीपातळी अधिक असल्याने कार बाहेर काढणे शक्य झाले नाही. अखेर कृष्णराजसागर जलाशयातून सोडण्यात येणारे पाणी थांबविण्यात आले. पाणीपातळी कमी झाल्यानंतर कार बाहेर काढण्यात आली. त्यात पाच जण मृतावस्थेत आढळले.









