आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या : उसप येथे संरक्षक भिंत आणि पेव्हर्स कामाची पायाभरणी
लाटंबार्से : डिचोलीचया विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या लाटंबार्से येथील नियोजित औद्योगिक वसाहत कार्यान्वति व्हावी. त्यासाठी सरकार दरबारी माझे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. आयडीसी कार्यान्वति झाल्यानंतर बऱ्याच अंशी मतदारसंघातील बेरोजगारीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? यांनी सांगून, आमदारकीच्या चालू कार्यकाळात ही स्वप्नपूर्ती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील उसप या गावात संरक्षक भिंत कामाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार डॉ. शेट्या? बोलत होते. नियोजित लाटंबार्से आयडीसीत लवकरच वीज आणि पाणी पुरवठा उपलब्ध कऊन देण्यात येणार आहे. सहा महिन्यात या वसाहतीत उद्योग प्रकल्प बांधकामांना चालना मिळणार आहे. असेही डॉ. शेट्या? यांनी सांगितले.
जीआयए’तून संरक्षक भिंत
’जीआयए’ निधीतून देऊळवाडा-उसप येथे संरक्षक भिंत बांधकाम आणि पेव्हर्स घालण्यात येणार आहे. आमदार डॉ. शेट्या? यांच्या हस्ते या कामाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी सरपंच पद्माकर मळीक, स्थानिक पंचसदस्य डॉ. रामा गावकर, माजी पंच तुळशीदास गावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









