कणकवली : प्रतिनिधी
वारगाव ग्रामपंचायतींच्या एका जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत भाजपचे प्रमोद केसरकर 203 मते घेऊन विजयी झाले. तर महेंद्र केसरकर यांना 120 मते मिळाली. नोटा 4 मते मिळाली.
हळवल ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रभाकर राणे 236 मते घेऊन विजयी झाले. तर सुभाष राणे यांना 167 मते मिळाली. नोटा तीन मते मिळाली.ओटव ग्रामपंचायतच्या सरपंच पदासहित तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले.









