गेल्या ६७ वर्षा पासुन सीमावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कधी आमची कर्नाटकाच्या जोखडातून सुटका होणार अन् कधी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार याकडे प्रत्येक सीमाबांधव डोळे लावून बसला आहे. सीमाबांधव जगाच्या पाठीवर कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला तरी आपल्यावर झालेल्या अन्यायाला विसरत नाही याची प्रचिती नुकतीच बद्रीनाथमध्ये आली. काही सीमाबांधव देवदर्शनासाठी बद्रीनाथ येथे गेले असता तिथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या परिवारासह आल्याचे समजताच संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देऊन मंदिर परिसर दणाणून सोडून उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतले. ठाकरे यांनी देखील सीमाबांधवाना प्रतिसाद दिला.
यावेळी बेळगाव शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे, विश्वनाथ पाटील, गजानन पाटील, किरण बडवान्नाचे, गजानन बाडीवाले, कल्लाप्पा पाटील, जोतिबा गडकरी, किरण सावंत, दयानंद मुतगेकर, शिवकुमार शहापूरकर, देसाई, भास्कर अनगोळकर आदी सीमाबांधव उपस्थित होते