मडगाव : कुडचडे येथे सातव्या चंदेरी उत्सवाच्या तयारीसाठी दयानंद कला केंद्राच्या कार्यालयात एक बैठक झाली. महोत्सवाचे कार्याध्यक्ष मोर्तू नाईक हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यंदाचे वर्ष भाऊसाहेब बांदोडकर 50 वी पुण्यतिथी वर्ष आहे. गेल्या वर्षी भारत सरकारचे पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका कार्यक्रमात एक सुचना केली होती. चंदेरी महोत्सवाची मुदत थोडी लांब करावी जेणेकरुन इतरांनाही या महोत्सवाचा लाभ घेता येईल. या सुचनेप्रमाणे या महोत्व्सवाची मुदत दोन आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 26 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत चंदेरी अत्सव होईल. गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे सिनेमाविषयक कार्यक्रम गोव्यातून टीव्ही चॅनलवर डान्स इंडिया डान्स, सारेगमप्। इंडियन आयडॉल मालिकेत सहभागी झालेल्या कलाकारांचे कार्यक्रम व भारत सरकारच्या सांस्कृतिक शिष्यवृत्ती प्राप्त विविध राज्यातील विद्यार्थ्यातर्फे विविधतेतून एकता कार्यक्रम आयोजन करण्याचेही ठरविण्यात आले. चंदेरी महोत्सव संस्कृती पर्यटन व खाद्य विभागात होतात. या वर्षी खास आकर्षण, सागर दर्शन, आयोजीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षपद्धतीप्रमाणे देशातील जास्तीत जास्त विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या सदस्यांना तसेच राज्यातील लोककला पथकांना निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. देशभरातील कलाकार मोठया संख्येने महात्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे.
महात्सवास शुभेच्छा देणारे पोष्टर्स, बॅनर्स फलकांचे प्रदर्शन करण्यात येईल तसेच जाहिरातीसाठीही एक समिती निवडण्यात आली. या समितीत सुभाष नाईक, मनोहर नाईक, केशव नाईव। भिकू नाईक, नवीन खांडेकर यांचा समावेश आहे. कुडचडे -काकोडा नगरपालिकेचे मैदान स्वच्छ करुन लवकरात लवकर विविध प्रकारची दालने, मनोरंजन पार्क, थाटण्यास उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्ता आली. नगरपालिका अध्यक्ष प्रदीप नाईक हे स्वत। एक कलाकार असुन नवी दिल्ली येथे झालेल्या गोवा सरकारने आयीजत केलेलया गोवा फेािस्टिव्हलमध्ये सपत्नीक त्यांनी भाग घेतला होता. त्याचा अनुभव चंदेरी माहात्सवाला लाभेल अशी अपेक्षा आयोजीत बाळगून आहेत. कुडचडे येथे हारा असा हा राष्ट्रीय प्रवाहात नोंद होडारा महोत्सव सर्वानी सहकार्य देऊन यशस्वी करावा असे दयानंद कला केंद्रातर्फे आवाहन करण्यात आले. सदर बैठकीत बंटी उडेलकर, अनिता नाईक, नारायण नाईक, मोहनदास देसाई, आनंदी नाईक, जयकुमार खांडेकर, कांचना नाईक, अनिता नाईक, आदींनी सुचना व विचार मांडले. पालक मंत्री व आश्रय दाने अध्यक्ष बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमास मान्यता देऊन आशिर्वाद दिले. कीडचे येथे चंदेरी महोत्सव पूर्व तयारी बैठक मार्गदर्शन करत अध्यक्ष मोर्तु नाइंक, उपाध्यक्ष सुभाष नाईक, मोहनदास देसाई, खजिनदार नवीन खांडेकर, आनंदी नाइंक, केशव नाईक व इतर सदस्य









