आरएसएस सासष्टीचा विजयादशमी उत्सव
मडगाव : संपूर्ण हिंदू समाजाला भेदभाव विरहित व एकत्रित करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, समाजाप्रती असलेली आपल्या जबाबदारीचे पालन करणे हे प्रत्येक स्वयंसेवकाने कर्तव्य आहे. बलशाली हिंदू समाज व राष्ट्र निर्माण करणे हेंच संघांचे उद्दिष्ट आहे असे उद्गार रा. स्व. सं. गोवा विभाग कार्यवाह महेश नारायण ढवळीकर यांनी काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सासष्टी तालुक्मयाचा विजयादशमी उत्सव रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी रवींद्र भवन मडगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. ढवळीकर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. दर वषी प्रमाणे कार्यक्रम सुऊ होण्या अगोदर गणवेशधारी स्वयंसेवकांचे सघोष पथ संचलन काढण्यात आले, पथ संचलनाला रवींद्र भवन येथून सुरवात करून कोलवा सर्कल, जुना बाजार, कोंब, आबाद फारिया, दामोदर साल, हॉली स्पिरीट स्कूल, बोर्डा मार्गे रवींद्र भवनला परत समाप्ती झाली. पथसंचलनाचा मार्ग सुंदर रांगोळीने सजविण्यात आला होता, जागोजागी मार्गावर नागरिक, माता-भगिनींनी पंचारती ओवाळून व पुष्पवृष्टी करून संचालनाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
पथसंचलन झाल्या नंतर प्रकट कार्यक्रमला सुऊवात झाली. या कार्यक्रमाला निवृत्त ले. कर्नल अनुराधा मलिक प्रमुख अतिथी व रा. स्व. सं. गोवा विभाग कार्यवाह महेश नारायण ढवळीकर प्रमुख वक्ते म्हणून हजर होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथी व प्रमुख वक्त्यांच्या हस्ते शस्त्रपुजनाने झाली. त्यानंतर स्वयंसेवकांनी दंड व योग ची प्रात्यक्षिक सादर केली, प्रमुख अतिथी निवृत्त ले. कर्नल अनुराधा मलिक यांनी आपल्या मनोगतात निमंत्रणा बद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघस्वयंसेवक करीत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. संघाचे राष्ट्र उभारणीत असलेल्या योगदानाची त्यांनी वाखाणणी केली.
प्रमुख वक्ते महेश नारायण ढवळीकर, विभाग कार्यवाह यांनी आपल्या बौद्धिकात संघाची कार्यपद्धती, उद्धीष्ट, धेय यांची माहिती देत, संघाच्या 98 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे ‘संघ कुछ भी नही करेगा लेकिन स्वयंसेवक कुछ नही छोडेंगा’ याची आठवण करून देत असतानाच पर्यावरण, नागरिक शिष्टाचार व समरसता यासाठी संघ करीत असलेल्या कामाची त्यांनी माहिती दिली. समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या पासून सुरवात करायला हवी, संघाची शताब्दी जवळ आली आहे आणि जुबिली साजरी करणे संघाच्या स्वभावात नसल्याचे सांगितले.
संघाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली, हल्लीच दिवंगत झालेले संघांचे जेष्ठ प्रचारक मा. रंगा हरीजी (वय 92) यांना दोन मिनिट मौन पाळून शांती मंत्राने श्र्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमच्या स्थानी छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांचा पत्र व्यवहार व 1947 स्वातंत्र संग्रामवर आधारित प्रदर्शनी तसेच पुस्तक विक्री स्टॉल लावण्यात आले होते. सासष्टी तालुका कार्यवाह सागर रिवणकर हे व्यासपीठावर उपस्थित होते, संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन अमित लोटलीकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, माताभगिनीं उपस्थित होते. या कार्यक्रमला मंत्री, आमदार, प्रबुद्ध नागरिक, वरिष्ठ अधिकारी यांची खास उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.









