हॉटेल इफाच्या तळमजल्यावरील सभागृहात दागिन्यांचे लक्षवेधी प्रदर्शन : 5 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले
बेळगाव : दिवाळी म्हणजे खरेदी, हे ठरलेलेच. परंतु, दिवाळी म्हणजे दागदागिन्यांसह वर्षभरातील मोठी खरेदी होय. दिवाळीचेच औचित्य साधून पोतदार ज्वेलर्सतर्फे हॉटेल इफाच्या तळमजल्यावरील सभागृहात दागिन्यांचे लक्षवेधी प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी खासदार मंगला अंगडी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या पत्नी ऐश्वर्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये प्रांतोप्रांतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. कोलकाता येथील लाईटवेट आणि स्टोनचे दागिने, महाराष्ट्राचे म्हणजेच प्रामुख्याने कोल्हापूरचे साज, ठुशी, टिक्का, चिंचपेटी, चपलाहार, मोहनमाळ, जयपूरचे बिड्स आणि जडाऊ कुंदनाचे दागिने, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि काश्मीर येथील टेम्पल ज्वेलरी आणि संपूर्ण जगभरातच वैशिष्ट्यापूर्ण नावलौकिक मिळविलेली किस्ना डायमंड ज्वेलरी यांचा समावेश आहे.
पारंपरिक दागिन्यांनाच नवा साज चढविण्याच्या क्रेझमध्ये वाढ
अलीकडे पारंपरिक दागिन्यांनाच नवा साज चढविण्याची क्रेझ वाढती आहे. महिलांना पारंपरिक दागिन्यांनाच नवा साज हवा असतो. तर तरुणींना वजनाने हलके, नाजूक परंतु, वैशिष्ट्यापूर्ण आणि दिसण्यास आधुनिक असे दागिने आवडू लागले आहेत. याचा विचार या प्रदर्शनामध्ये केला गेला आहे. कर्णफुले, अंगठ्या, ब्रेसलेट, नेकलेस, विविध प्रकारचे हार, बांगड्या या सर्वांचाच या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. मंगला अंगडी व ऐश्वर्या पाटील यांनी फीत कापून व दीपप्रज्ज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी करून त्यांनी आयोजकांची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मीना पोतदार, स्वयंप्रभा व निशिल पोतदार, वृषाली व संजय, गीता व राजू, सीमा व अनिल, श्रीशा व सर्वेश, सहना व मिहीर हे पोतदार कुटुंबीय उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि. 5 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत सर्वांसाठी खुले आहे.









