भाजपच्या छत्तीसगडसाठीच्या घोषणापत्रात मोठे आश्वासन, महिलांना दरवर्षी मिळणार 12 हजार रुपये
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. पुढील 5 वर्षांमध्ये छत्तीसगडला देखील सर्वाधिक विकसित राज्य करू. 15 वर्षांच्या आमच्या सरकारने राज्याच्या विकासासाठी अनेक कामे केली. पंचायत निवडणुकीत 50 टक्के आरक्षण महिलांना देण्याची सुरुवात छत्तीसगडमधूनच झाली. तसेच आमच्या सरकारनेच पॉवर सरप्लस राज्याचा दर्जा मिळवून दिला. आगामी दोन वर्षांमध्ये लाख पदे भरण्यात येतील असे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले आहे. भाजप सरकारने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 2 वरून 15 वर पोहोचविली आहे. तसेच राज्यात आता 50 इंजिनियरिंग कॉलेज आहेत. छत्तीसगडच्या विकासात सर्वात मोठे विघ्न भूपेश बघेल आहेत.बघेल हे काँग्रेस पक्षाचे एटीएम आहेत असा आरोप शाह यांनी केला आहे.
-भाजपने कृषक उन्नती योजना सुरू करत 3100 रुपये प्रति क्विंटल दराने गहू खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.
-महतारी वंदन योजना लागू करत प्रत्येक विवाहित महिलेला 12 हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
-राज्यात सत्तेवर आल्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 18 लाख नवे घरे निर्माण करण्याचे आश्वासन.
-दीनदयाळ उपाध्याय कृषी मजूर कल्याण योजना सुरू करणार, भूमीहीन शेतमजुराला दरवर्षी 10 हजार रुपये देणार.
-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाखाऐवजी 10 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा.
-छत्तीसगडमध्ये उद्यम क्रांती योजना सुरू करणार, राज्यातील युवांना 50 टक्के अनुदानासह व्याजमुक्त कर्ज.
-राजधानी क्षेत्र स्थापन करत रायपूर, नवे रायपूर, दुर्ग आणि भिलाई नगर क्षेत्राचा संतुलित विकास करणार.
-भ्रष्टाचाराविरोधात आयोग स्थापन करणार. भ्रष्टाचारविरोधी तक्रारीसाठी वेबपोर्टल तयार केले जाणार.
-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून मासिक प्रवास भत्ता देण्यात येणार.
-1 हजार किमी लांबीचा शक्तिपीठ प्रकल्प सुरू करत राज्यातील 5 शक्तिपीठांच्या क्षेत्रांचा विकास केला जाणार.
-राज्यातील लोकांना श्रीरामलल्लाचे दर्शन घडविण्यासाठी अयोध्यावारी घडविली जाणार.









