बांदा मराठा समाजाच्या वतीने बांदेश्वराला साकडे
मयुर चराटकर
बांदा
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे व समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेली आरक्षणाची लढाई यशस्वी व्हावी यासाठी आज बांदा मराठा समाजाच्या वतीने श्री देव बांदेश्वर भूमिका देवीला साकडे घालण्यात आले.
राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या समितीने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्याने आरक्षण मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमरण उपोषणास बसलेल्या जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. त्यांनी सायंकाळी उशीरा आपले उपोषण मागे घेतले. राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेले आंदोलन देखील समाज बांधवानी मागे घ्यावे असे आवाहन केले होते.
त्यानुसार आज सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्याचे रद्द करण्यात आले. आज सकाळी श्रीफळ ठेऊन सांगणे करण्यात आले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, सचिव म. गो. सावंत, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, गोविंद सावंत, राजा सावंत, विराज परब, निलेश कदम, दीपक सावंत, राजेश सावंत, परिमल सावंत आदिसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.









