वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे शुक्रवारी भारताच्या 8 दिवसीय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. हा दौरा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सहकार्याची समीक्षा करणे आणि ‘अनुकरणीय’ भागीदारीला वृद्धींगत करण्याची संधी प्रदान करणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून म्हटले गेले. भूतानचे राजे वांगचूक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान भारत-भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी हे भूतानचे राजे वांगचूक यांची भेट घेणार आहेत. भूतानचे राजे वांगचूक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 3-10 नोव्हेंबर या कालावधीत भारताच्या भूतानचे राजे हे आसाम आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा दौरा देखील करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री अन् सहकार्याचे संबंध अनोखे असून ते परस्पर विश्वासावर आधारित आहेत, असे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. भूतानने अलिकडेच चीनसोबतचा सीमावाद सोडविण्यासाठी चर्चा केली आहे. दोन्ही देशांमधील सीमावाद हा प्रामुख्याने डोकलामशी संबंधित आहे.









