मुंबई
अदानी समूहातील कंपनी अदानी टोटल गॅस लिमिटेड यांचे समभाग बुधवारी शेअरबाजारात काहीसे घसरणीत होते. अदानी टोटल गॅसचा समभाग 1 टक्का घसरत 560 रुपयांवर बीएसईवर इंट्रा डे दरम्यान व्यवहार करत होता. कंपनीने सप्टेंबर अखेरचा तिमाही नफ्याचा निकाल जाहीर केला असून 173 कोटी रुपयांवर नफा प्राप्त करण्यात कंपनीला यश आलंय. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 160 कोटी रुपयांवर समाधान मानले होते. याच कालावधीत कंपनीने 1179 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.









