बेळगाव : शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या 2023 च्या विद्यार्थ्यांच्या तुकडीने दि. 29 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरून रशियाला प्रयाण केले. सदर विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रवाना झाले असून विमानतळावरच शाईन ब्राईटचे कार्यकारी संचालक डॉ. सूरज अनगोळकर यांनी विद्यार्थ्यांना रशियातील वैद्यकीय शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सूरज यांनी रशियन विद्यापीठामधून वैद्यकीय शाखेमध्ये एमडी पदवी घेतली आहे. रशियाला रवाना झालेले विद्यार्थी बेळगावसह पुणे, कोल्हापूर, नाशिक, मदुराई व चेन्नई येथील आहेत. ज्यांना याबाबत अधिक माहिती हवी आहे त्यांनी डॉ. सूरज अनगोळकर यांच्याशी 9019949143 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
Previous Articleश्वानप्रेमींसाठी वॉकेथॉनला उत्साही प्रतिसाद
Next Article आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडंल…









