पहिल्यांदा होणार महिला व युवकांच्या गटात मॅटवर
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे भव्य कुस्ती मैदान यंदाच्या वर्षी संघटनेच्या वतीने बेळगाव शहरात पहिल्यांदाच मॅटवर आणि गुणावर आधारित कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. बेळगाव येथील आनंदवाडी आखाड्यात यंदाच्या वर्षी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने शनिवार 13 व रविवार 14 जानेवारी रोजी भव्य राज्यस्तरीय गुणावर आधारीत व मॅटवर या कुस्त्या आयोजीत करण्यात येणार आहेत. सदर कुस्ती स्पर्धा विविध वजनी गटात महिला व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी व खेळाडूना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सुधारण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
कर्नाटक व दक्षिण भारतातुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये या भागातील युवा कुस्तीपटूना मॅटवर व गुणावर आधारित स्पर्धांचा अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाचे व भाजपचे नेते किरण जाधव यांनी बालिका आदर्श कुस्ती संकलनाला व मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या सदस्यांना भेट देऊन तेथील पैलवानांना मार्गदर्शन केले व जानेवारी दिनांक 13 व 14 रोजी होणाऱ्या या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी त्यांनी भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले व कुस्ती संकुलनतील पैलवानांना मार्गदर्शन केले. यावेळी बालिका आदर्श कुस्ती संकलनाचे कुस्ती प्रशिक्षक मारूती घाडी, नवरत्नसिंग पनवर, हिरालाल चव्हाण, नवरत्नसिंग, मनोज बिर्जे, विनोद चौगुले, मनोहर गावडा, अतुल शिरोळे, आदि उपस्थित होते.









