बेळगाव : बेंगळुर येथे कर्नाटक सरकारी पब्लिक स्कूल उत्तरहळ्ळी स्कूल आयोजित राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत ज्ञानमंदिर शाळेचा विद्यार्थी अनिलकुमार बनवरलाल सायनी याने 90 किलो वरील गटात कास्यपदक पटकावित यश संपादन केले आहे. उत्तरहळ्ळी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत 90 किलो वरील वजनी गटात बेळगावच्या अनिलकुमार सायनी याने उपांत्यफेरीत धडक मारली. पण उपांत्यफेरीत त्याला पराभव पत्करावा लागला. कास्य पदकासाठी झालेल्या लढतीत त्यांने विजय मिळवून कास्यपदक पटकाविले. त्याबद्दल ज्ञानमंदिर स्कूलचे व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकानी त्याचे खास गौरव केला. त्याला शाळेचे क्रीडा शिक्षक चिदानंद असोदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleबालिका आदर्शच्या तीन खेळाडूंची निवड
Next Article ज्योती होसट्टीला तीन सुवर्णपदके









