बेळगाव : कोलार येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित कर्नाटक राज्यस्थरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव विभागीय संघाचे खेळाडू कोलारला रवाना आहेत. कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खताच्या 17 वर्षाखालील मुलांच्या माध्यमिक आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव विभागीय संघात सेंट झेवियर स्कूलचे 5 बास्केटबॉलपटूंची निवड झाली आहे. या संघात सेंट झेवियर स्कूलचे चैतन्या तरळे, अभय कग्रांराळकर, साईराज पाटील, अथर्व होनगेकर, आशुतोष अनगोळकर यांचा समावेश करण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक फादर सिरील ब्राग्स, त्यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक चेस्टर रोजारियो यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleपाकचा 7 गड्यांनी दणदणीत विजय
Next Article बालिका आदर्शच्या तीन खेळाडूंची निवड









