कोकणात शेती आणि बागायतीसाठी वन्य प्राण्यांचा उपद्रव ही मोठी डोकेदुखी झाली आह़े कित्येक लोकांनी हा उपद्रव थांबवता येत नसल्याने शेती आणि बागायतीचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आह़े यावर शासन स्तरावर म्हणावे तसे गांभीर्य दाखवले जात नाही आणि आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटाच्या खाईत अधिक ढकलला जात आह़े
कोकणात वानर, माकडे, कोल्हे, गवा, डुक्कर, भेकरे यासारखे वन्य प्राणी शेती आणि बागायती उत्पादनांवर तुटून पडत आहेत़ यातील प्रत्येकाची नुकसान करण्याची सवय वेगवेगळी आणि कोल्हे, डुक्कर आदी प्राणी रात्रीच्यावेळी शेतीचा नाश करतात तर माकडांना दिवसातील कोणतीही वेळ संचारासाठी सोयीची वाटत़े हे प्राणी एकटे दुकटे फिरत नसून अनेक प्राणी एकत्र येऊन शेतीचा नाश करतात़ काही वेळा एकाच शेतात किंवा बागेत येऊन ठाण मांडतात़ फळे किंवा फुले नसली तरी रोपटी किंवा झाडांचा नाश करण्यासाठी मागेपुढे पाहात नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आह़े
शेतीसाठी कितीही नियोजन कऱा कष्टपूर्वक लागवड करा पण उत्पादन हाती पडण्यापूर्वी वन्यप्राणी त्यावर तुटून पडले तर सारी मेहनत फुकट जाते, असा अनुभव विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना आला आह़े पूर्वीच्या काळी माकडे विशिष्ट झाडांवर आढळत असत़ आता त्यांनी सर्व झाडांसह सर्व पिकांचे नुकसान केल्याचे दिसून आले अशी तक्रार शेतकरी वर्गातून आह़े
रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे शेतकरी अविनाश काळे यांनी आतापर्यंत दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करुन या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले होत़े अलीकडे त्यांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केला आणि काळे यांना सांगितले की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत आपण एक बैठक आयोजित करु आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राह़ू अद्याप अशी बैठक झाली नसली तरी त्या बैठकीसाठी पूर्वतयारीची पावले मात्र पडू लागली आहेत़
27 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार काळे यांना वानर माकडे विषयाबाबत चर्चेसाठी बोलावण्यात आले होत़े त्यावेळी मंत्रालयातील मीटिंगबाबत नियोजन सुरू आहे. माकडांचा कायमचा बंदोबस्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाजूनी नियोजन करून त्याची तयारी करून नंतर बैठक घ्यावी त्यामध्ये आवश्यक ते सगळे निर्णय व्हावेत असा प्रयत्न सुरू आहे.
यावेळी काळे यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशप्रमाणे केंद्रशासनाकडे शेतीमध्ये येणारे वानर, माकड मारण्याची परवानगी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा आणि तशी परवानगी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यासाठी मिळवण्यात यावी. वानर, माकड उपद्रवाबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाकडे दिलेला आहे. त्यात मारण्याची परवानगी हा उपाय तसेच नुकसान भरपाईमधील नवीन तरतुदी सुचवलेल्या आहेत. त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी. बिहारमध्ये नीलगाय आणि गोवा राज्यात डुकरे शेतीला उपद्रव करत असल्याने तेथील राज्य सरकारे व्यावसायिक शूटरकडून त्याना मारत आहेत. त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने वानर, माकड यांचा बंदोबस्त करावा. तात्पुरता उपाय म्हणून वानर, माकडे पकडून शासनातर्फे ती वाघांसाठी राखीव अभयारण्यात सोडण्यात यावी. काळे यांनी हे उपाय सुचवल्यानंतर याप्रकरणी उचित कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आल़ी
तात्पुरत्या स्वरूपातील उपायांबाबतदेखील चर्चा करण्यात आल़ी वानर, माकडे पकडून नेण्याकरता जिल्हा वनअधिकारी यांच्याशी बोलून तातडीने वानर, माकडे पकडणाऱ्या माणसांना बोलावून त्याचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी पालकमंत्री यांनी सुचवले. मिरजमधील दोन माणसे आणि वनखात्याचे अधिकारी गोळप गावात आले होते. त्यांना गोळप आणि कोळंबेमध्ये वानरांच्या तसेच माकडांच्या अनेक टोळ्या दाखवल्या. मात्र आलेली माणसे वानर किंवा माकड पकडू शकले नाहीत. पुढच्या आठ दिवसात अजून दोन वेगळी माणसे त्यामध्ये एक औरंगाबाद येथून समाधान गिरी यांना माकडे पकडण्याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी बोलावले आह़े
कोकणच्या शेतकऱ्यांना होणारा वन्यजिवांचा त्रास लक्षात घेऊन व्यापक आणि दिर्घकालीन उपाययोजना राबवणे आवश्यक आह़े कोकणात शासकीय जमीन अल्प प्रमाणात आहेत़ खासगी जमीन अधिकाधिक प्रमाणात फळझाड लागवडीसाठी वापरण्यात येत़े हे करण्या]िकरता नैसर्गिक रितीने उभी राहिलेली झाडे कापण्यात येत आहेत़ जैवविविधतेचे विशेष ओळख असलेल्या सह्याद्रीमध्ये झाडतोड होत आह़े हजारो ट्रक जळावू लाकूड आणि इमारत लाकूड तोडले जात आह़े वन खात्याचे अधिकारी लाकूड वाहतुकीचे परवाने कसलाही संकोच न करता धडाधड देत आहेत़ वन संरक्षण ऐवजी लाकूड वाहतुकीचे परवाने देणारे अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांचा परिचय वाढत आह़े लाकूड वाहतूक परवाना इतक्या सफाईदारपणे अर्जदाराच्या हाती कसा काय पडतो अशी विचारणा केल्यावर वनखात्याचे अधिकारी स्मितहास्य करतात़, असा अनुभव लोकांना येत आह़े
नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस संपत असून बिबट्यापासून माकडांपर्यंत अनेक वन्यप्राणी वनक्षेत्राबाहेर जाउढन भक्ष मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत़ एका बाजूला विकासाचे नाव घेऊन खासगी आणि शासकीय प्रणाली हातात हात घालून चालत आहेत़ त्यावेळी राज्याचे वनक्षेत्र घटत आह़े
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा राज्यांमध्ये वनक्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न होत आह़े पण तसा प्रयत्न पश्चिमेकडील राज्यांमध्ये होत नसल्याने वन्य प्राणी अधिवासाबाहेर जात आह़े त्याचा त्रास लोकांना होत आह़े वन्य प्राणी शेतीचे नुकसान करतात त्यानंतर विशिष्ट निकषांच्या आधिन राहून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत़े ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने शेतकरी त्याकडे कमी प्रमाणात वळतात़ ही प्रक्रिया सुटसुटीत करावी अशीही मागणी होत आह़े
सुंकांत चक्रदेव








