गाड्यांमधून येत पळवून नेतात पूर्ण सेटअप
जगात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. परंतु ब्रिटनमधील एक घटना सध्या चर्चेत आहे. तेथे चोरांकडून आता वेगळीच गोष्ट चोरण्यात येत आहे. हे चोर टोळी तयार करत पूर्ण टॉयलेटच चोरून नेत आहेत.
ब्रिटनमध्ये एक पूर्ण माफिया स्टाइल सुरू असून ही टोळी देशभरात विविध ठिकाणी जात लोकांच्या सुविधेसाठी निर्मित पोर्टेबल टॉयलेट चोरून नेत आहेत. येथे पोर्टेबल किंवा मोबाइल टॉयलेट्सची कमतरता निर्माण झाल्याने या आपत्तीत संधी शोधण्यासाठी टोळ्या संघटित पद्धतीने टॉयलेट चोरून त्याची विक्री करत आहेत.
टोळी निर्माण करून चोर संघटित पद्धतीने येतात आणि सार्वजनिक ठिकाणचे पोर्टेबल टॉयलेटची पूर्ण केबिनच उचलून नेत आहेत. केवळ मागील महिन्यात सुमारे 40 नवे टॉयलेट आउटडोअर लोकेशनमधून गायब झाले आहेत. याची किंमत कमीतकमी 40 लाख रुपयांपेक्षा अधिक राहिली असेल. हे पोर्टेबल टॉयलेट्स मोटरस्पोर्ट्स स्पर्धेकरता ठेवण्यात आले होते.
एकदा चोरीला गेलेला टॉयलेट पुन्हा मिळविणे अवघड असते. पोलीस विविध ठिकाणांवरून अशाप्रकारच्या टॉयलेट क्यूबिकल्स चोरीला गेल्याच्या घटना नोंदवत आहेत. आता पोलिसांकडून या पोर्टेबल टॉयलेट्सवर निशाण लावण्याचे आवाहन करत आहेत, जेणेकरून चोरीला गेलेल्या टॉयलेट्सची ओळख पटविता येईल अशी माहिती थ्री काउंटीज टॉयलेट हायरचे नील ग्रिफिन यांनी दिली आहे.
ऑनलाईन विक्रीचा प्रकार
अशाप्रकारे टॉयलेट्स चोरल्यावर चोर त्यांची ईबे आणि गमट्री नावाच्या साइट्सवर विक्री करत आहेत. तेथे त्यांची किंमत सर्वसाधारणपणे 50 हजार रुपये ठरविण्यात येते. विशेष म्हणजे टॉयलेट चोरीला गेल्याची बाब पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचे संबंधित मालकांचे मानणे आहे. तर याप्रकरणी नुकसानभरपाई मिळविणे सोपे नाही. टॉयलेट मोठ्या संख्येत चोरले जात असल्याने त्यांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.









