मुंबई
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी मॅरीकोचे समभाग मंगळवारी शेअर बाजारात वधारताना दिसून आले. कंपनीने दुसऱ्या तिमाहित चांगला नफा मिळविल्यामुळे त्याचा परिणाम समभाग वधारण्यावर दिसून आला. मॅरीकोचे समभाग मंगळवारी शेअर बाजारात 1.30 टक्के वाढत 539 रुपयांवर पोहोचले होते. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 360 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी कंपनीने 307 कोटी रुपयांचा नफा मिळविला.









