ओजस्वी साळुंखे, रोशन साळुंखे यांनीही पटकावला प्रथम क्रमांक
आचरा | प्रतिनिधी
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आचरे येथे कथामित्र मारुती आचरेकर कथानगरीत संपन्न झाली. कथाकथन स्पर्धेत मालवण तालुक्यातील शाळास्तर, केंद्रस्तर आदी स्पर्धा जिंकून ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. यात सक्षम पांगम, ओजस्वी साळुंखे, रोशन साळुंखे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
गट १) ३री/४थी – शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा-
प्रथम क्रमांक – सक्षम संदीप पांगम (आचरे नं.१), द्वितीय क्रमांक -प्रांजल सतीश तेरसे (टोपीवाला प्राथमिक), तृतीय क्रमांक – श्रेयश राजेंद्र चौधरी (चिंदर कुंभारवाडी), उत्तेजनार्थ- जान्हवी आनंद परब (भगवंतगड), स्पृहा संदीप भोवर (भंडारी प्राथमिक)
गट २) ५वी/६वी – गुरु शिष्यांच्या कथा- प्रथम क्रमांक – ओजस्वी कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कूल मालवण), द्वितीय क्रमांक – नुर्वी गिरीश शेडगे (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), तृतीय क्रमांक -दुर्वा प्रसाद परब (मसुरे देऊळवाडा), उत्तेजनार्थ भाग्यश्री विलास हडकर (हडी नं.२), स्वरा नित्यानंद तळवडकर (आचरे पिरावाडी)
गट ३) ७वी/८वी – महिला शास्त्रज्ञांच्या कथा- प्रथम क्रमांक – रोशन कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कूल मालवण), द्वितीय क्रमांक – यज्ञेश राजेश गोलतकर (तोंडवळी वरची), तृतीय क्रमांक – किंजल आनंद परब (भगवंतगड), उत्तेजनार्थ यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (मसुरे देऊळवाडा), दिव्या नितीन गावकर (इंग्लिश मीडियम स्कूल, आचरा)
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना कथामाला मालवणच्या वतीने व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरेच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल ऑफिसर श्री. आनंदराव डिंगणकर यांनी प्रायोजित केलेली रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व ६५ स्पर्धकांना कै.सौ. सुमेधा कांबळी चॅरिटेबल ट्रस्ट, रेवंडी मालवण यांच्याकडून साधना दिवाळी अंक भेट देण्यात आला.
या स्पर्धेसाठी गट क्र. १ मध्ये रामचंद्र कुबल, भावना मुणगेकर, श्रावणी प्रभू, तेजल ताम्हणकर, सायली परब, गट क्रं.२ मध्ये नवनाथ भोळे, अमृता मांजरेकर, अनिरुद्ध आचरेकर, निसार सोलकर, अमोल खेडकर, संजय परब, गट क्र.३ मध्ये परशुराम गुरव, नितीन प्रभू, महादेव बागडे, मधुरा माणगावकर, रामकृष्ण रेवडेकर यांनी संयोजन व परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रम प्रसंगी कथामाला मालवणचे सुरेश ठाकूर, लक्ष्मण आचरेकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवसाय विकास अधिकारी श्री. कृष्णा दिल्लेवार, संजोग कुंभार, सुगंधा गुरव, चंद्रकांत माने, तुकाराम पडवळ, सुधीर धुरी, संदीप पांगम, सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर हडप, भानुदास तळगावकर, सुरेखा सामंत, श्रावणी प्रभू, योगिता कदम, सायली पाटील, मनाली फाटक, प्रविण पारकर, गुरुनाथ ताम्हणकर उपस्थित होते. कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तर पांडुरंग कोचरेकर यांनी कथामालेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व आभार मानले.









