वकिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरुपी पीठासाठी इमारत उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले. बेळगाव येथे कायमस्वरुपी ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पीठाची स्थापना करण्यासाठी शिफारस केली आहे. अतिरिक्त ग्राहक आयोगाच्या न्यायालयासाठीही स्वतंत्र कक्ष व मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची शिफारस केली आहे. याची पूर्तता केली नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी त्वरित आयोगाच्या पीठासाठी इमारत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. व्ही. एस. पाटील, अॅड. एम. यू. हिरेमठ, अॅड. एन. जी. सूर्यवंशी, अॅड. एस. यू. रेहमान, अॅड. पी. एन. नायक उपस्थित होते.









