एकनाथ शिंदे या सरकारचा पूर्ण कालावधी होईपर्यत मुख्यमंत्री राहतील. तसेच महाराष्ट्राचा विकासासाठी मी त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन आणि त्यांच्या पाठीशी उभे राहीन. इतकेच काय ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेर्तृत्वाखाली निवडणूका लढवल्या जातील. असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या व्हिडीयोने महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा एकदा तापल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवर काल मी पुन्हा येईन हा व्हिडीयो पोस्ट करण्यात आला. त्यावर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधकांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला.
त्यासंदर्भात माध्यमांनी आज देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, “व्हिडिओवर एव्हढे राजकारण का केले जात आहे हे मला समजत नाही. जर एखाद्याला यायचे असेल तर ते घोषणा करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करतील का? मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि एकाऩाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून पूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील. आम्ही सर्वजण मिळून काम करत आहोत. महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”