मेष
कामाच्या ठिकाणी मानसन्मान प्राप्ती होईल पण शत्रू कारस्थान करतील, जाणून बुजून तुमच्या मार्गामध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. काळजी नसावी, तुमच्या मान प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. कामात गोंधळ होऊ शकतो. काही कामासाठी छोटी यात्रा होईल.
मोहरीच्या तेलाचे कच्चे थेंब जमिनीवर सोडावे
वृषभ
नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. बढतीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात थोडा ताणतणाव संभवतो. वाणीवर अंकुश ठेवावा. तुमच्यामुळे एखादा माणूस दुखावू शकतो. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. तीर्थयात्रा किंवा धार्मिक स्थळाला भेट द्यायचा विचार कराल.
मध जवळ ठेवावा
मिथुन
तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. अडचणी येतील पण तुम्ही मात कराल. छोट्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. नोकरीमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवू शकतात. वैवाहिक जोडीदाराच्या सहकार्याने कामे होतील. वाहन जपून चालवावे. कामाच्या ठिकाणी किंवा मित्र-मैत्रिणींच्यामध्ये हेवा वाढेल.
गोड खाऊन कामाला जावे
कर्क
जमिनीशी संबंधित व्यवहार पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. वाहन खरेदी विक्रीसाठी काळ उत्तम आहे. नोकरदार वर्गाला खुशखबर मिळण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्ती होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रवास घडेल. कोणी नाव बदनाम करणार नाही याची काळजी घ्यावी.
दीप दान करा
सिंह
स्नायूंचे किंवा नसासंबंधी एखादे दुखणे डोके वर काढू शकते. मित्रांच्या गोतावळ्यात खरे मित्र कोण हे ओळखणे गरजेचे असेल. आर्थिक बाबतीत लोक फायदा उचलू शकतात. प्रवासाच्या बाबतीत उत्तम ग्रहमान आहे. प्रेमींसाठी उत्तम काळ आहे. जुने भांडण पुन्हा होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
पिंपळाचे पान जवळ ठेवावे
कन्या
इतके दिवस ज्या धनप्राप्तीच्या संधीसाठी वाट बघत होतात त्या मिळतील, योग्य फायदा घ्यावा. आळशीपणामुळे नुकसान होऊ शकते. दागदागिने किंवा घरातील गरजेच्या वस्तू करता खर्च कराल. जमीन जुमल्याचे प्रश्न निकालात निघतील. छोट्या गुंतवणुकीतून फायदा असेल. वैवाहिक आयुष्यात सुखप्राप्ती होईल.
तांब्याचे नाणे विहिरीत टाकावे.
तूळ
आरोग्याच्या बाबतीत चिंतीत असाल. कुटुंबात शुभप्रसंग संभवतात. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कामास येईल. शेअर सारख्या गुंतवणुकीतून आर्थिक हानी संभवते. वैवाहिक जीवनात स्वभावदोषाच्या कारणास्तव भांडण संभवते. दूरचा प्रवास करणार असाल तर शक्मयतो पुढे ढकलावा.
खीर दान द्या
वृश्चिक
पोटासंबंधी तक्रारीमुळे मन अस्वस्थ होऊ शकते. आर्थिक लाभ उत्तम असेल. कुटुंबातील सदस्यांकरता वेळ काढाल. व्यावसायिक धोरण यशस्वी ठरेल. स्थावर संपत्तीच्या बाबतीत नशीब साथ देईल. संतती सुख उत्तम मिळेल. छोट्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो. प्रेम संबंधात यश मिळेल.
उडीद दान द्यावे
धनु
सगळ्या प्रकारच्या लाभासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या मित्र-मैत्रिणीसोबत आनंदाने वेळ घालवाल. आर्थिक नुकसान होता होता वाचेल. कौटुंबिक सुख उत्तम असेल. मिळकतीचे नवीन स्रोत सापडू शकतात. आवडत्या व्यक्तीसोबत प्रवास संभवतो. पितृ चिंता वाटेल. शेअरसारखी धोकादायक गुंतवणूक टाळावी.
हीना अत्तर लावा
मकर
पैशाच्या बाबतीत भाग्यवान असाल. धावपळीमुळे थकवा येऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तीविषयी काळजी वाटेल. प्रवासातून धनलाभ होईल. जमिनीचे व्यवहार पुढे ढकलावे. प्रेमींसाठी काळ तितकासा अनुकूल नाही. नोकरीत चुका होऊ देऊ नका. जोडीदाराचे मन सांभाळावे लागेल.
काळी मिरी एक दिवस जवळ ठेवून पाण्यात सोडावी
कुंभ
गरजेपेक्षा जास्त खर्च झाल्याने आर्थिक ताण येऊ शकतो. लाभाच्या संधी येतील. ज्येष्ठ बंधू किंवा भगिनींकडून लाभ होईल. नोकरी व्यवसायात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये. तीर्थयात्रेचा योग होत आहे. वर्तणूक चांगली ठेवावी. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. सरप्राईज मिळेल.
तुरटीने दात घासावे
मीन
अनुकूल काळ आहे. आरोग्याची साथ मिळेल. कुटुंबातील समाधान अबाधित राहावे म्हणून स्वत:च्या मनाला दुय्यम करावे लागेल. कागदोपत्री व्यवहारात सावध असावे. आईच्या तब्येतीविषयी काळजी वाटण्याची शक्मयता आहे. एखादी गुप्त बातमी कळू शकते. लहान मोठी जखम होऊ नये म्हणून सावध असावे.
लहान मुलांना आंबट गोड मिठाई द्या
घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवत असेल (बाधा इ.), अमावास्या/ पौर्णिमेला भांडणे होणे, आजारी पडणे, खूप प्रयत्न करून देखील यश न मिळणे, कायम आर्थिक तंगी असे होत असेल तर काळ्या कपड्यात 8 तुळशीची पाने, 8 काळी मिरी आणि आघाड्याचे मूळ एकत्र बांधून वर टांगावे. रोज गोमूत्र घालून फरशी पुसावी. धूप घालावा.





