तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे!
नवी दिल्ली
: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची कार्यसंस्कृती बदलण्याची गरज असून देशाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यासाठी येथील तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करण्यास तयार असले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यांनी एका मुलाखती दरम्यान हा मंत्र भारतीय युवा वर्गाला दिला आहे.
उत्पादकता सुधारण्याची गरज
मूर्ती म्हणाले, ‘आपण आपल्या कामाची उत्पादकता सुधारायला हवी, विशेषत: तरुणांनी. तसे केल्याशिवाय आम्ही प्रचंड प्रगती केलेल्या देशांशी स्पर्धा करू शकणार नाही.’ असेही त्यांनी नमूद केले. ‘आपल्याला शिस्तबद्ध राहण्याची आणि कामाची उत्पादकता सुधारण्याची गरज आहे. माझा अंदाज आहे की आपण असे करत नाही तोपर्यंत बिचारे सरकार तरी काय करू शकते? आणि प्रत्येक सरकार लोकांच्या संस्कृतीइतकेच चांगले असते, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले आहे.









