राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी राज्यातील लोकांसाठी पाच योजनांची घोषणा केली आहे. या योजनांमध्ये जुनी पेन्शन योजनेबरोबर शेतकऱ्यांकडून गाईच्या शेणाची खरेदी याचाही समावेश आहे. इतर महत्वाच्या आश्वासनामध्ये शासकिय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा टॅबलेट आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई म्हणून 15 लाख रूपयांचे विमा संरक्षण यांचा समावेश आहे.
माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, “राजस्थान विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर काँग्रेसचे सरकार निवडूण आले तर राज्यातील 1 कोटी महिलांना तीन वर्षांसाठी मोफत इंटरनेट सेवेसह स्मार्टफोनही उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच मागील आश्वासनांवर प्रकाश टाकताना, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे दिलेले वचन वेळेत पूर्ण झाल्याचेही सांगितले.
जयपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना, “राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले आहे. राहुल गांधींनी शेतकऱ्यांचे सात दिवसांत कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमच्या सरकारने ते माफ केले आहे.” असा दावाही त्यांनी केला.
गेहलोत असा आरोप केला कि, जे लोक भाजपच्या विरोधात बोलत आहेत विशेषता काँग्रेस नेत्यांना ईडीकडून लक्ष केले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या जनतेला आश्वासन देताना काँग्रेसच्या ‘गॅरंटी मॉडेल’ची नक्कल करत आहेत असाही दावा केला.









