येळ्ळूर विभाग समितीच्या बैठकीत निर्धार
येळ्ळूर : सीमाभागात 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. त्या दिवशी म. ए. समितीच्यावतीने मूक सायकल फेरी काढली जाते. या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्यावतीने करण्यात आला आहे. येळ्ळूर येथील बाल शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्धार करण्यात आला असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील होते. यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, मनोहर पाटील, मनोहर घाडी यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर प्रमोद पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. बैठकीला ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, जोतिबा चौगुले, परशराम परीट, श्रीकांत येळ्ळूरकर, परशराम घाडी, ग्राम पंचायत सदस्या मनीषा घाडी, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील, सौरभ कुगजी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









