वृत्तसंस्था /लेविस्टन
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेतील लेविस्टनमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून त्याची ओळख रॉबर्ट कार्ड अशी जाहीर करण्यात आली आहे. सदर आरोपी हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपी रॉबर्ट कार्ड हा सैन्य प्रशिक्षित शस्त्रास्त्र प्रशिक्षक असून त्याला अलीकडेच मानसिक आरोग्य सुविधेसाठी पाठविण्यात आले होते, असे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. लेविस्टन येथील बॉलिंग अॅली आणि बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात 22 जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात अराजकता पसरली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राज्याच्या गव्हर्नर जेनेट मिल्स यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांना शक्मय ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.









