सावंतवाडी प्रतिनिधी
शिरशिंगे गोटवेवाडी येथील मनोहर- संतोषगड परिसरातील भागात आज अकरा वाजल्यापासून विमान घिरट्या घालत होते. गोठवेवाडी परिसरातील अत्यंत लोकांच्या नजरेत भरेल असे हे विमान संपूर्ण परिसर न्याहाळत होते. गोटवेवाडीत विमानाचा आवाज आणि स्पष्टपणे विमान नजरेत दिसत असल्यामुळे या भागातील लोकांनी हे गिरट्या घालणारे विमान पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. आपल्या परिसरात अत्यंत घराच्या लगत हे विमान फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीची छायाही निर्माण झाली होती. मात्र हे विमान नौदलाच्या येत्या 4 डिसेंबरला मालवण येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण किल्ल्यावरील नौदलाच्या दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे खास सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषता मालवणचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला तसेच शिवापूर येथील मनोहर संतोषगड आणि तेथील परिसर आणि संपूर्ण सिंधुदुर्ग ह्या विमानाद्वारे टेहळणी करण्यात येत होती असे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.शिरशिंगे गोटवेवाडी, शिवापूर ,कलंबिस्त ,परिसरात हे विमान आज तब्बल अर्धा ते एक तास संपूर्ण परिसर फिरत होते. याबाबत माजी सरपंच जीवन लाड यांनी याबाबत प्रशासनाला कल्पनाही दिली. मात्र, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले. नौदलाचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यानिमित्ताने हे विमान आले असावे असे स्पष्ट केले.









