
जोडप्याने खरेदी केले अजब रिटायरमेंट होम
निवृत्तीनंतर काय करावे हे ठरविणारे अत्यंत आकर्षक प्लॅन्स लोकांकडे असतात. कुणी शांत ठिकाणी घर बांधून राहू इच्छितो, तर कुणी स्वत:चे कालौघात मागे पडलेले छंद पूर्ण करू पाहतो. परंतु अलिकडेच एका वृद्ध जोडप्याने अजब रिटायरमेंट होम प्लॅन केला आहे.

या जोडप्याने स्वत:चे घर विकण्याचा आणि कायमस्वरुपी एमव्ही नॅरेटिव्ह या क्रूज जहाजावर राहण्याचाप्लॅन केला आहे. 80 वर्षीय माइक सोरोकर आणि त्यांच्या 75 वर्षीय पत्नी बार्बरा यांनी एमव्ही नॅरेटिव्ह या जहाजावर 2.5 दशलक्ष डॉलर्समध्ये (20 कोटी रुपये) एक केबिन खरेदी केली आहे. माइक आणि बार्बरा यांना उर्वरित जीवन समुद्रकिनारी किंवा भर समुद्रात राहून घालवायचे आहे.
अन्य क्रूज जहाजांपेक्षा वेगळे एमव्ही
नॅरेटिव्ह केवळ सुटी घालविण्यासाठी राहण्याची योजना सादर करत नाही. तर पूर्ण क्रूज केबिन आणि अपार्टमेंटची विक्री करत आहे. दीर्घकाळ राहण्यासाठी केबिनची खरेदी करता येणार आहे. जहाज निर्माण करणारी कंपनी स्टोरीलाइन्सने शिपवर अनेक अॅक्टिव्हिटी, लॉन्ड्री सर्व्हिस, जिमपासून 20 रेस्टॉरंट आणि बरेच काही ऑन-बोर्ड उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
यापूर्वी केवळ चारवेळा व्रूज सफारीवर गेलेले माइक आणि बार्बरा यांनी शिपवर एक केबिन खरेदी करण्याची मोठी जोखीम पत्करली आहे. आम्हाला सामान्य क्रूज पसंत असून ज्यात एक किंवा दोन दिवसात कुठल्याही बेटावर फिरणे असते, परंतु हे सर्वकाही ठराविक वेळेत होते आणि वेळेपूर्वी बंदरावर पोहोचावे लागते. अशा स्थितीत आम्ही कुठल्याही पळापळीशिवाय दीर्घकाळापर्यंत शिप किंवा आयलँडवर जगण्याचा विचार केला असल्याचे माइक यांनी सांगितले आहे.
काही वर्षांमध्ये तयार होणार जहाज
नव्या लोकांना भेटण्यासाठी आणि अनेक नव्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही आतुर आहोत, असे या जोडप्याने म्हटले आहे. तर एमव्ही नॅरेटिव्ह या जहाजाच्या निर्मितीचे कार्य सध्या सुरू आहे. काही वर्षांमध्ये हे जहाज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या जहाजावर आणखी काही लोक केबिन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. हा रिटायरमेंट होमचा एक स्वस्त पर्याय आहे. कित्येक वर्षांपर्यंत क्रूजवर राहणे प्रत्येकालाच पसंत पडणार नाही, परंतु हे वाटते तितके विचित्र नाही असे ऑस्ट्रेलियन जोडप्याने सांगितले आहे.









