अभिनेत्री खुशाली कपूरने स्वत:चा आगामी चित्रपट ‘स्टारफिश’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यानिमित्त तिने सोशल मीडियावर सेटवरील अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. खुशालीकडून शेअर करण्यात आलेली ही छायाचित्रे आता व्हायरल होत आहेत. स्टारफिश या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. अद्भूत आणि रोमांचकारी कहाणीचा आनंद घेत हा प्रवास पूर्ण झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिभावंत लोकांशी जोडले गेले होते असे खुशालीने म्हटले आहे.

खुशालीचा ‘स्टारफिश’ हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. खुशाली या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अखिलेश जायसवाल यांनी केले आहे. खुशालीसोबत या चित्रपटात मिलिंद सोमण, एहान भट आणि तुषार खन्ना हे कलाकार दिसून येणार आहेत.
या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत आव्हानात्मक होती. शारीरिक आणि भावनात्मक स्वरुपात ही भूमिका साकारणे माझ्यासाठी खरोखरच आव्हान होते. एक जलतरणपटू म्हणून स्वत:च्या अॅथलेटिक क्षमतांचे सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागल्याचे खुशालीने म्हटले आहे. खुशाली ही टी-सीरिज कंपनीचे प्रमुख भूषण कुमार यांची बहिण आहे.









