वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया
अॅपलचा विशेष कार्यक्रम ‘स्केरी फास्ट’ 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार या खास कार्यक्रमात स्नॅपियर एम 3 चिप्ससह सुसज्ज नवीन मॅक उपकरणांचे अनावरण केले जाऊ शकते. भारतीय वेळेनुसार सकाळी 5.30 वाजल्यापासून अॅपलच्या वेबसाईटवर हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार असल्याची माहिती आहे.
अॅपलने आपल्या वेबसाइटवर इव्हेंटसाठी सादर केलेल्या अॅनिमेशनमध्ये, अॅपल लोगो फाइंडर चिन्हात रूपांतरित होताना दिसत आहे. यावरून नवीन मॅक येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अॅपल या इव्हेंटमध्ये वेगवान कामगिरीसाठी आपली एम3 चिप उपकरणे सादर करणार आहे.
15 इंच डिस्प्ले असलेले मॅकबुक जूनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. या वर्षी जूनमध्ये, अॅपलने वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स-डब्लूडब्लूडीसी-23 मध्ये 15-इंच डिस्प्लेसह जगातील सर्वात पातळ (11.5 एमएम) लॅपटॉप मॅकबुक एअर लाँच केले. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये आहे. मॅकबुक एअर नवीन एम2 चिप सह सादर करण्यात आले.
मॅकबुक एअरमध्ये 18 तासांचा बॅकअपची बॅटरी आहे. हे मिडनाईट, स्टारलाइट, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
अॅपलचा या वर्षातील तिसरा कार्यक्रम
अॅपलचा 2023 मधील पहिला कार्यक्रम 23 जून रोजी झाला होता. या कार्यक्रमात लॅपटॉप व्यतिरिक्त आणखी 3 उत्पादने लाँच करण्यात आली. यामध्ये मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट व्हिजन प्रो, डेस्कटॉप मॅक प्रो आणि स्टुडिओ यांचा समावेश आहे.
अॅपलचा या वर्षीचा दुसरा कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आला होता. वंडललस्ट इव्हेंटमध्ये अॅपलने आयफोन 15 सीरीजची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये ठेवली होती. कंपनीने वॉच सीरीज 9 आणि वॉच अल्ट्रा 2 देखील सादर केले. टाइप-सी पोर्ट पहिल्यांदाच देण्यात आला.









