सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेना यांच्यावतीने व आरोग्य विभागाच्या सहकार्याने दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर सिंधुदुर्ग शिवसनेचे जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे. रक्तदात्यांनी दत्ता साळगांवकर 8766411077 संतोष परब- 9765467287 यांच्याकडे संपर्क साधून नावनोंदणी करावी. तसेच याच उपजिल्हा रूग्णालयात वेंगुर्ला येथे महिलांची तपासणी, ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी, डोळे तपासणी, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, कान, नाक, घसा तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री PMJAY कार्डची मोफत नोंदणी करून मिळणार आहे. याचा लाभ वेंगुर्ले शहरातील जनतेने मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर व शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.









