टेस्ट रिपोर्ट पाहून डॉक्टरांना बसला धक्का
आपण जे काही खात असतो, त्याचा थेट प्रभाव आमच्या शरीरावर होत असतो. अनेक लोकांना एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थाची अॅलर्जी असू शकते आणि हा खाद्यपदार्थ शरीरात पोहोचल्यावर धोकादायक परिणाम होऊ शकतात. अलिकडेच एका 9 वर्षीय मुलीसोबत सँडविच खाल्ल्यावर जे घडले ते हैराण करणारे होते. या मुलीला कुठल्याही गोष्टीपासून अॅलर्जी नव्हती तरीही देखील एक सँडविच खाल्ल्यावर ती जवळपास मृत्यूच्या दारात पोहोचली होती.

ही ऑस्ट्रेलियन मुलगी स्वत:च्या नाश्त्यात समाविष्ट असलेल्या सँडविच मधील एका गोष्टीमुळे संकटात सापडली. यामुळे तिला सीवियर इंफेक्शन आणि न्यूरोलॉजिकल डॅमेज झाले. ही अजब दुर्घटना आमचे शहर न्यूकॅसल येथे घडली, तेथील एका दुकानातून मुलीने बेकन आणि अंड्याचा सँडविच खरेदी केला होता, अशी माहिती मुलीची आई क्रिस्टन साँडर्स यांनी दिली आहे.

माझी मुलगी सँडविच खात असताना अचानक तिचा श्वास कोंडू लागला, आम्हाला सँडविच गळ्यात अडकले असावे असे वाटले, आम्ही तिची पाठ थोपटत तिला पाणी प्यायला दिले. यानंतर तिच्या गळ्यात खवखव आणि अन्न गिळणे अवघड ठरू लागले तसेच तिची प्रकृती बिघडू लागली. मग माझी मुलगी कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देताना गोंधळून जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तिला असे पाहून आम्ही डॉक्टरांना पाचारण केले, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला त्वरित इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलविले, परंतु डॉक्टर येईपर्यंत तिची प्रकृती अत्यंत बिघडली होती, तिची स्मरणशक्ती हरपली होती आणि ती कुटुंबीयांना देखील ओळखू शकत नव्हती, असे साँडर्स यांनी सांगितले आहे.
मुलीचे सीटी स्कॅन करण्यात आले असता भयावह गोष्ट समोर आली. मुलीच्या गळ्यात जे दिसून आले ते पाहून डॉक्टर हैराण झाले. तिच्या गळ्यात एका केसाइतका तारेचा तुकडा अडकला होता. हा एक बारबीक्यू ब्रशचा तुकडा होता. जो सँडविचमधून तिच्या शरीरात पोहोचला होता. या तारेने तिच्या अन्ननलिकेला छिद्र पाडले होते. यामुळे तिला भयंकर इंफेक्शन झाले होते असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.मुलीला बरं करण्यासाठी डॉक्टरांना आर्टरी बदलण्याची प्रक्रिया करावी लागली आहे. गंभीर शस्त्रक्रियेनंतर मुलीचा जीव वाचविण्यास डॉक्टरांना यश आले आहे, ही मुलगी सुमारे महिन्याभरापर्यंत रुग्णालयात होती आणि अखेर बरी होऊन घरी परतली आहे. जे काही घडले ते सामान्य नव्हते. असा अनुभव कुणालाच येऊ नये असे साँडर्स यांनी म्हटले आहे.









