क्रीति सेनॉनसोबत झळकणार
सिंघम प्रेंचाइजीच्या चित्रपटांमध्ये पोलीस अधिकारी बाजीराव सिंघमच्या भूमिकेत अजय देवगणला लोकांनी प्रचंड प्रेम दिले. अजय सध्या या फ्रेंचाइजीच्या तिसऱ्या चित्रपटात काम करत आहे. परंतु आता पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल देखील दिसून येणार आहे.
काजोल स्वत:चा आगामी चित्रपट ‘दो पत्ती’मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सुमारे तीन दशकांच्या कारकीर्दीत काजोल पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. दो पत्ती या चित्रपटात काजोल उत्तर भारतीय पार्श्वभूमी असलेल्या एका निर्भीड पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत क्रीति सेनॉन मुख्य भूमिकेत आहे. अभिनयासोबत क्रीति या चित्रपटाद्वारे निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा एक हिस्सा अलिकडेच उत्तराखंडमध्ये पूर्ण झाला आहे. नेटफ्लिक्ससाठी तयार होणाऱ्या या चित्रपटाची टीम आता नव्या शेड्यूलच्या चित्रिकरणाच्या तयारीत आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत काजोलला पाहणे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.









