पुष्पवर्षाव-फटाक्यांची आतषबाजी करून दौडीचे भव्य स्वागत : युवक-युवतींचा मोठा सहभाग
खानापूर : खानापूर शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीच्या आठव्या दिवशी मोठ्या संख्येने युवा, युवती, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले हेते. रविवारच्या दौडीमुळी सारे खानापूर शहर शिवमय बनले आहे. शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पूजा प्रविण अगणोजी, अमित परब यांनी केली. दौडच्या स्वागतासाठी रस्ते रांगोळ्यानी सजवले होते. अयोध्यानगर येथे दौडीचे भव्य स्वागत केले. फुलेवाडी, मुडेवाडी येथे दौडीचे स्वागत केले. हत्तरगुंजी येथे दौडीवर पुष्पवर्षाव व फटाक्यांची आतषबाजी करून दौडीचे भव्य स्वागत केले. आरती व प्रेरणामंत्र होऊन दौडची सांगता झाली.
दौडीचा उद्याचा मार्ग
मंगळवार दि. 24 रोजी श्री शिवस्मारक, बुरुड गल्ली, लक्ष्मीनगर, न्यू नाईक गल्ली, श्री समादेवी मंदिर, श्री शिव मंदिर हिरेमठ, होसमनी गल्ली, कडोलकर गल्ली, केंचापूर गल्ली, श्री गणपती मंदिर येथे सांगता होणार आहे.
बांदेकरवाडा पंचक्रोशीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
बांदेकरवाडा येथे दौडीला पंचक्रोशीतील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सकाळी 5.30 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि ध्वजाचे पूजन करून दौडीला सुरवात करण्यात आली. यानंतर दौड बांदेकरवाडा, कबनाळी, कोकणवाडा, मळव, अल्लोळी या गावातून फिरुन दौड मुघवडे येथे येताच दौडीचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.
झुंजवाड येथे दुर्गा दौडीचे उत्साही स्वागत
नंदगड : बेकवाड व गर्बेनहट्टी गावातील दुर्गादौडीचे झुंजवाड (के. एन.) येथे रविवारी उत्साही स्वागत करण्यात आले. झुंजवाड गावातील विविध गल्ल्यातून फिरून कलमेश्वर मंदिराजवळ प्रेरणामंत्र होऊन दौडीची सांगता झाली. यावेळी धारकऱ्यासह युवक, युवती, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते.









