हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील यासीर मुल्ला यांनी घडविले माणूसकीचे दर्शन
पुलाची शिरोली प्रतिनिधी
शुक्रवारी सायंकाळी सांगली फाटा(पुलाची शिरोली) येथे घोडा गाडीच्या एका बाजूला घोडं तर दुसऱ्या बाजूला महिला जू धरून घोडागाडी घेवून जाताना हेरल्यातील यासीर मुल्ला यांना दिसले. त्या गाडीवर एक कुत्रे देखील होते. हे पाहिल्यावर यासीर मुल्ला यांनी आपली गाडी बाजूला घेवून त्यांची विचारपूस केली असता ते कुटुंब पंढरपूर भागातील असल्याचे समजले. त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता, ते रोजगार करुन आपले पोट भरण्यासाठी कोल्हापूरातील जवाहर नगर येथे तंबू मारुन राहिले होते. शुक्रवारी रात्री मद्यधुंद अज्ञात कांही तरुणांनी त्यांना मारहाण केली. व त्यांचा एक चांगला घोड, आठ हजार रुपये व मोबाईल हँडसेट काढून घेतला व त्यांना हाकलून लावले असल्याचे सांगितले. हे ऐकताच यासीर यांनी त्यांना आपल्या हेरले गावात आणले व त्यांच्या पोटभर नाष्टाची सोय केली. त्यांनी आपल्या गावात आसपास घोड्याची चौकशी करून बघितली त्यांना काय घोड मिळाल नाही. मग त्यांनी त्यांच्यात व कागल येथील शाहबाज भैय्याकडे असलेले स्वतः टेम्पो भाडे देवून घोड्याचे बछडं आणले व एक रुपया न घेता त्यांना ते जुपुन दिले.यासीर मुल्ला यांनी दर्शिवलेल्या माणुसकीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









