वार्ताहर / काकती
ब्रिटिश राजवटीविरूद्ध विजय मिळविलेल्या राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बेंगळूर येथून आलेल्या ज्योतीचे शुक्रवारी उत्साही वातावरणात स्वागत केले.
काकती ग्रामस्थ, ग्राम पंचायत, विजयोत्सव समिती यांच्यावतीने राणी चन्नम्मा स्मारकानजीक पवित्र ज्योतीचे औक्षण करून अभिवादन केले. राणी चन्नम्मा फोटो व पुतळ्याचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, विजयोत्सव समिती अध्यक्ष एस. डी. पाटील, माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ, उपतहसीलदार सदाशिव साळुंखे, तलाठी प्रकाश गमाणी, शशिकांत पाटील आदींनी पूजन करून पुष्पहार घातले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब इरगौंडा देसाई, आर. के. पाटील, बाबासाहेब शंकरगौडा देसाई, ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, विद्यार्थी उपस्थित होते.









