सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे मीच कशाला अनेक जण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मी दोन वेळा या मतदारसंघात निवडणूक लढवली ती पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीनेच. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सहज सर्वच निवडणुकीमध्ये भाजपला स्वतंत्र निवडणूक लढवण्यास द्यावे. अशी आमची सर्वांची आग्रही मागणी आहे. ज्यांची ताकदच नाही त्या दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनाच बळ हवे आहे. त्यासाठी सर्वच निवडणुका चिन्हावर लढवण्याचा आग्रह सर्वांचा आहे. शिवसेना पक्षातील स्थानिक एकही पदाधिकारी कार्यकर्ता शिंदे गटात आलेला नाही. ही वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींना माहित आहे. त्यामुळे आमची भाजपची ताकद येथे 70% हून अधिक आहे. मी निवडणूक लढवणार की नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण आम्हाला भाजप पक्ष येथे अधिक मजबूत करायचा आहे. असे भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. श्री तेली म्हणाले कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनाच त्या त्या भागातच अधिकाधिक स्थान देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले . यावेळी संजू परब ,रवींद्र मडगावकर ,अजय गोंधावळे ,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









